मुंबई – बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ओह माय गॉड 2 सेन्सॉरच्या वादात अडकला आहे, दरम्यान, OMG 2 चे नवीन गाणे इंटरनेटवर मोठ्या धूमधडाक्यात रिलीज करण्यात आले आहे. ओह माय गॉड 2 च्या ‘हर हर महादेव’ या गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. कारणही तसेच आहे यामध्ये अक्षय कुमारचा अक्राळ विक्राळ लूक पाहायला मिळत आहे.
हर हर महादेव मध्ये अक्षय कुमार त्याच्या कपाळावर भस्म लावून अक्षरशः तांडव करताना दिसतो.यावेळेसची अक्षय कुमारची उर्जा आणि म्युझिक अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे. या गाण्यामध्ये शिवभक्त रस्त्यावर उतरून भक्तीरसात तल्लीन होऊन नाचताना दिसतात. अक्षय कुमार देखील यावेळी आपल्या जटा मोकळ्या सोडून भस्म लावून नाचताना दिसत आहे.
अक्षय कुमारच्या शिव तांडवने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट ओह माय गॉड 2 ला सेन्सॉर बोर्डाने A प्रमाणपत्र देत 15-20 ठिकाणी कात्री लावण्यास सांगितले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या टीमने ओ माय गॉड 2 मधील अनेक दृश्ये वादग्रस्त असल्याचे वर्णन म्हंटले आहे.
View this post on Instagram
ओ माय गॉड 2 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यावेळी अक्षय कुमारच्या चित्रपटाची टक्कर सनी देओलच्या ‘गदर’ या आयकॉनिक चित्रपटाच्या सिक्वेलशी होणार आहे.