मुंबई – ‘OMG 2’ च्या यशानंतर आता अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सध्या अक्षय उत्तर प्रदेशातील सीतामढी येथे शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका वेगळ्या अंदाजात दिसला आहे, त्याच्या हा अंदाज चाहत्यांना खूप आवडतो आहे.
#WATCH | Actor Akshay Kumar in Uttar Pradesh’s Sitapur for the shooting of his upcoming film ‘Sky Force’ pic.twitter.com/jzd2hLXtkZ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 29, 2023
व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमार बाईक चालवत आहे आणि त्याच्याभोवती पोलिसांची फौज आहे. व्हिडिओमध्ये अक्षय बाईकवरून या पोलिसांना हॅलो करताना आणि त्यांच्याशी हाथ मिळवितांना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बाईक चालवताना अक्षय कुमार पहिल्यांदा त्याच्या चाहत्यांशी हाथ मिळवतोआणि नंतर तो बाईक बाजूला पार्क करतो आणि पलीकडे त्याची वाट पाहत असलेल्या त्याच्या चाहत्यांना भेटतो. व्हिडिओमध्ये अक्षय डेनिम, फोल्ड स्लीव्हज, सनग्लासेससह पांढरा आणि निळा स्ट्रीप केलेला शर्ट घातला आहे आणि फुकरा स्टाईलमध्ये चाहत्यांशी भेटताना दिसत आहे.
रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार ‘स्काय फोर्स’ नावाच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याशिवाय ‘खिलाडी’ अभिनेत्याकडे ‘हाऊसफुल 5’, ‘वेलकम टू द जंगल’, ‘हेरा फेरी 3’ सारखे सिनेमेही पाइपलाइनमध्ये आहेत.
अक्षयकडे सध्या चित्रपटांची लांबलचक रांग आहे. त्याच्याकडे ‘सूरराई पोत्रू’ चा हिंदी रिमेक फेब्रुवारी 2024 मध्ये रिलीज होणार आहे. टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटातही तो दिसणार आहे.