मुंबई – सुपरस्टार अक्षय कुमार चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कर भरणारा स्टार बनला आहे. यासाठी आयकर विभागाने अक्षयला ‘सन्मान पत्र’ही दिले आहे. अक्षय कुमार वर्षभरात 5-6 चित्रपट करतो आणि भरमसाठ फी घेतो. म्हणूनच इंडस्ट्रीतील सर्वात जास्त कर भरणारा स्टार म्हणून अक्षयकडे पहिले जाते.
अक्षय कुमार हा सर्वाधिक कर भरणारा आहे
अक्षय कुमारही आपल्या कमाईतील मोठा हिस्सा गरजू आणि दानधर्मासाठी खर्च करतो. अक्षय कुमार गेल्या पाच वर्षांपासून सर्वाधिक कर भरणारा स्टार ठरला आहे. यावेळीही त्याने मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक कर भरला आहे. अक्षयने यावर्षी किती टॅक्स भरला आहे, हे सध्या कळलेले नाही. मात्र प्राप्तिकर विभागाने त्याला सन्मानाचे पत्र दिले असून अक्षय सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रिटी असल्याचे सांगितले आहे.
2018 मध्ये, अक्षय कुमार जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सातव्या क्रमांकावर होता. त्यानंतर फोर्ब्स मासिकाने त्याला आपल्या यादीत सातव्या क्रमांकावर स्थान दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्याच्या एका चित्रपटाची फीही करोडोंमध्ये आहे. मिळालेल्या माहितीवरून, अक्षयने त्याच्या शेवटच्या रिलीज झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटासाठी 60 कोटी रुपये घेतले होते. त्याचप्रमाणे एका जाहिरातीसाठी तो 8 ते 10 कोटी रुपये घेतो.
2017 आणि 2018 मध्ये इतका कर भरण्यात आला होता
टॅक्सबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय कुमारने 2017 मध्ये 29.5 कोटींचा टॅक्स भरला होता. त्या वर्षी तो सर्वाधिक कर भरणारा स्टार होता. त्याचप्रमाणे 2014-15 मध्ये देखील अक्षय कुमार सर्वाधिक कर भरणारा अभिनेता बनला होता. अक्षय कुमारच्या टीमला त्याच्या अनुपस्थितीत आयकर विभागाकडून ‘सन्मान पत्र’ मिळाले.
अक्षय कुमारचे आगामी 7 सिनेमे
अक्षय कुमार हा केवळ सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक नाही. तर एकामागून एक अनेक चित्रपटांच्या रिलीज आणि जाहिरातींमधून तो भरपूर कमाई करतो. अशा परिस्थितीत अक्षय यंदाही सर्वाधिक टॅक्स भरणारा सेलिब्रिटी ठरला, तर नवल वाटायला नको. अक्षयच्या हातात अजूनही सात चित्रपट आहेत. हे चित्रपट आहेत ‘रक्षा बंधन’, ‘राम सेतू’, ‘कटपुतली’, ‘सेल्फी’, ‘OMG 2’, ‘कॅप्सूल गिल’ आणि सुरियाच्या ‘सूरराई पोत्रू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक देखील अक्षय करतोय.