-->

अक्षय आणि कृती सेननच्या “बच्चन पांडे’चे शूटिंग राजस्थानमध्ये

अक्षय कुमार सध्या “बेल्‌ बॉटम’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र 2021 च्या सुरुवातीला तो “बच्चन पांडे’ या नवीन सिनेमाचे शूटिंग सुरू करणार आहे. पण त्याच्या आगोदर “अतरंगी रे’चे शुटिंग देखील अक्षयला संपवायचे आहे.

“बच्चन पांडे’चे शूटिंग जानेवारीमध्ये सुरू होऊन मार्चपर्यंत संपलेही असेल, असे नियोजन अक्षयने केले आहे. “बच्चन पांडे’मध्ये अक्षय एका गॅंगस्टरच्या रोलमध्ये असेल, तर कृती सेनन जर्नलिस्टच्या रोलमध्ये दिसणार आहे. यापूर्वी हे दोघेही “हाऊसफुल्ल 4’मध्ये एकत्र होते.

या शुटिंगसाठी अक्षय आणि “बच्चन पांडे’चे सगळे युनिट राजस्थानात जैसलमेरल जाणार आहेत. करोनाची साथ आता जरा कमी झाल्याने फिल्म शूटिंगला परवानगी मिळाली आहे. पण आताप्रयंत आऊटडोअर शुटिंग कोणत्याच सिनेमाचे इत्क्‍यात झालेले नाही.

“बच्चन पांडे’चे आऊटडोअर शूटिंग होणार असल्याने सर्व आवश्‍यक परवानगी काढून आणि खबरदारीच्या उपाय योजना करूनच शूटिंग होणार आहे. युनिटमधील सर्वांच्याच कोविड टेस्ट अनिवार्यपणे केल्या जाणार आहेत. एवढेच नाही, तर शूटिंगच्या तीन दिवस आगोदर सर्वांना जैसलमेरच्या हॉटेलमध्ये क्‍वॉरंटाईनदेखील केले जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.