पुणे – राज्यात अनलॉक अंतिम टप्प्यात आले असताना जनजिवन सुरळीत झाले आहे. यात खासगी आणी सरकारी कार्यालयाचे सेवाही सुरु झाल्या आहेत. यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन कार्यालयाने सुरु केलेले स्लॉट बुकिंग रद्द करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. त्यांनी एक पत्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.
यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर लायसन बाबत व ट्रान्सपोर्ट सर्व प्रकारच्या सेवा बाबत व नॉन ट्रान्सपोर्ट च्या सर्व सेवा बाबत स्लॉट बुक करणे गरजेचे होते व ते तेव्हा आवश्यक सुद्धा होते. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता लायसन्स नूतनीकरण बाबत लायसन्स डुबलीकेट बाबत लायसन्स पत्ता बदलणे बाबत लायसन्स वरील नाव बदलणे बाबत व रिक्षा बॅच टॅक्सी बॅच बस बॅच साठी जानेवारी 2021 तारीख मिळत आहे.
त्यामुळे या सर्व सेवांसाठी स्लॉट बुकिंग करावे लागत आहे. तसेच खाजगी वाहन विभागात गाडी नावावर करणे गाडीवर बॅंकेचा बोजा चढविणे गाडीचे बोजा उतरविणे व अन्य सेवांसाठी स्लॉट बुक करणे अनिवार्य आहे. तेथेच परिवहन विभागात सुद्धा गाडी नावावर करणे गाडीवर बॅंकेचा बोजा चढविणे गाडीवर बॅंकेचा बोजा उतरवणे परमिट या सर्व सेवन बाबतसुध्दा स्लॉट बुक करणे अनिवार्य आहे.
अनलॉकनंतर जनजिवन आणी व्यवहार नियमीतपणे सुरळीत झाले आहेत. इतर सरकारी कार्यालयांने कामकाजही नेहमी प्रमाणे खबरदारी घेऊन होत आहे. यामुळ करोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने केलेली ही सक्ती त्वरित रद्द करून पूर्वीची परिस्थिती बहाल करावी. या मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन स्कूलच्या वतीने अध्यक्ष राजू घाटोळे, महासचिव यशवंत कुंभार यांनी दिले आहे.