लखनौ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपण उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही असे म्हटले आहे. राष्ट्रीय लोकदल पक्षाशी आपल्या पक्षाची निवडणूक आघाडी फायनल झाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. पीटीआयशी बोलताना अखिलेश यांनी ही माहिती दिली.
अखिलेश हेच समाजवादी पक्षाचे मुख्ममंत्री पदाचे दावेदार आहेत. पण तरीही ते ही निवडणूक लढवणार नाहीत त्यामागचे कारण मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. अखिलेश हे सध्या समाजवादी पक्षाचे लोकसभा सदस्य आहेत.
आझमगड लोकसभा मतदार संघातून ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. तांत्रिक कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा. लोकसभेचा राजीनामा देऊन विधानसभा निवडणूक लढवण्यापेक्षा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कधीही सहा महिन्याच्या अवधित उत्तरप्रदेश विधानसभेचे सदस्य बनू शकतात.