अभिनेत्री नुसरत भरुचाने उत्कृष्ट अभिनय कौशल्याच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले आहे, नुसरत सध्या तिच्या आगामी ‘अकेली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाल्यापासूनच चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. नुकताच निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. समोर आलेल्या या व्हिडिओंमध्ये नुसरत भरुचा तिचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
निर्मात्यांनी ‘अकेली’चा ट्रेलर रिलीज केला आहे. नुसरत भरुचा अभिनीत, हा चित्रपट युद्धग्रस्त इराकमध्ये एकट्या अडकलेल्या एका भारतीय मुलीची कथा सांगतो, जिला जगण्यासाठी सर्व अडचणींशी लढावे लागते. ट्रेलर पाहिल्यानंतर एकीकडे चित्रपटाची संपूर्ण कथा पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरमध्ये नुसरत भरुचा ज्या पद्धतीने जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहे ते खूपच रंजक आहे. त्या मुलीची असहायता… तिची झुंज बघण्यासारखी आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला नुसरत भरुचा बुरखा घालून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण काही सशस्त्र लोकांनी तिला घेरल्याचं दिसतं. कुटुंबापासून दूर इराकमध्ये असलेल्या या तरुणीला इतर मुलींसोबत बंदी बनवलं जातं. त्यानंतर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचा घृणास्पद खेळ या ट्रेलरमध्ये दाखवला जातो.
‘अकेली’मध्ये नुसरत भरुचा व्यतिरिक्त निशांत दहिया, त्साही हालेवी आणि अमीर बुत्रस हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दशमी स्टुडिओचा हा चित्रपट 18 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रणय मेश्राम यांनी केले आहे.