मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार अचानक राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेत नेतेही उपस्थित आहेत. अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभावनात दाखल झाले आहे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप आणि शिंदे गटाचे नेतेही राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत. याशिवाय, भाजप आणि राष्ट्रवादीचे काही नेते आधीपासूनच राजभवनात दाखल झाले आहेत. आज अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे इतर काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात पोहोचताच माध्यमांनी गराडा घातला. त्यांना घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ‘मी पाहून सांगतो,’ अशी मोजकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत या राजकीय नाट्याचा काय शेवट असेल याचा अंदाज आहे.
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार
* दिलीप वळसे पाटील
* छगन भुजबळ
* हसन मुश्रीफ
* किरण लहमाटे
* सरोज अहिरे
* अशोक पवार
* अनिल पाटील
* सुनिल टिंगरे
* अमोल मिटकरी दौलत दरोडा
* अनुल बेणके
* रामराजे निंबाळकर
* धनंजय मुंडे
* निलेश लंके
* मकरंद पाटील