PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला आज शुक्रवारपासून सुरुवात झाली. त्या महोत्सवाचा उदघाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.
दरम्यान, नाशिकमध्ये दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वगतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी मोदींचा रोड शो पार पडला. या ‘रोड शो’चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडीओ? । PM Modi in Nashik
रोड शो दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी यांच्या एका बाजूला तर देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या दुसऱ्या बाजूला उभे आहेत. अजित पवार मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे असल्याचे दिसत आहे. यावरून आता सोशल मीडियावर अजित पवार पिछाडीवर गेल्याची चर्चा सुरु आहे.
विरोधकांना संधी
अजित पवार भाजप शिवसेना (शिंदे) युतीत गेल्यापासून त्यांची कुचंबणा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार करण्यात येतो. अशातच पंतप्रधान मोदींच्या रोड शो मध्ये अजित पवार यांना मिळालेले स्थान विरोधकांच्या हाती आयती संधी घेऊन आल्याचं दिसतंय. विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.
मोदींचा नाशिकमध्ये रोड शो । PM Modi in Nashik
तत्पूर्वी, हॉटेल मिरचीपासून पंतप्रधान मोदी यांच्या रोड शो’ला सुरुवात झाली. त्यानंतर थेट काळाराम मंदिराचे दर्शन आणि आरतीला त्यांनी हजेरी लावली. आरतीनंतर रामकुडांची पाहणी केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले.