सातारा – राज्यातील सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील नावाजलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध झाली आहे. कारखान्याच्या सर्व मतदारसंघात निवडून द्यायच्या प्रतिनिधी संख्येइतकेच उमेदवार त्या त्या मतदारसंघात शिल्लक राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिला आहे.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची 2022- 23 ते 2027- 28 या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु होती. महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम 2014 च्या नियम 32 मधील तरतुदीनुसार सत्ताधारी पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ऊस उत्पादक सभासद गट क्र. 1 सातारामधून शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले, नामदेव विष्णू सावंत, राजेंद्र भिकू घोरपडे बिनविरोध निवडून आले. इतर मतदारसंघ व निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक 2 नागठाणेमधून मोहनराव नथुराम साळुंखे, एकनाथ उर्फ सुनील दत्तात्रय निकम, यशवंत हरी साळुंखे. व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -3 अतितमधून शिवाजी रघुनाथ काळभोर, रामचंद्र रंगराव जगदाळे, बजरंग श्रीरंग जाधव, व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक 4 चिंचणेरमधून विश्वास रामचंद्र शेडगे, भास्कर एकनाथ घोरपडे, विजयकुमार आनंदराव घोरपडे, व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक 5 गोवेमधून सर्जेराव दिनकरराव सावंत, पांडुरंग आप्पाजी साबळे, नितीन भानुदास पाटील, सातारा उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थामधून शशिकांत यशवंत साळुंखे, महिला राखीव मतदारसंघातून विजया सत्पाल फडतरे आणि वनिता अशोक शेलार, इतर मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघातून जयवंत रामचंद्र कुंभार, विमुक्त जाती भटक्या जमाती, विमाप्र राखीव मतदारसंघातून अशोक रामचंद्र कुराडे, अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून वसंत जगन्नाथ पवार बिनविरोध निवडून आले.