अक्षय कुमारच्या आगामी “सूर्यवंशी’ मध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंहदेखील असणार आहेत. या तिन्ही स्टार्सनी हैदराबादमध्ये या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात केली आहे. या चित्रपटाच्या अखेरच्या सीनमध्ये ‘सिंघम’, ‘सिंबा’ आणि ‘सूर्यवंशी’ एकजुटीने जबरदस्त फाइट करताना दिसणार आहेत. या क्लायमॅक्सवर रोहित शेट्टीची संपूर्ण टीम मागील अनेक महिन्यांपासून काम करते आहे. या अखेरच्या दृश्यामध्ये रणवीर आणि अजय अनुक्रमे ‘सिंबा’ आणि ‘सिंघम’ च्या रोलमधूनच सहभागी होणार आहेत.
याशिवाय क्लायमॅक्समध्ये प्रचंड मारधाड आणि तुफान कॉमेडीही असणार आहे. ‘सूर्यवंशी’ च्या शूटिंगला या वर्षांच्या सुरुवातीला मुंबईत झाली. फिल्मच्या काही भागांचे शुटिंग बॅंकॉकमध्ये झाले आहे. आता क्लायमॅक्सचे शुटिंग हैदराबादमध्ये होणार आहे. चित्रपटाचा उरलेला भाग हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटीमध्ये शूट झाला आहे.
अक्षय कुमारच्या “सूर्यवंशी’चे शुटिंग जोरात चालू असतानाच दुसरीकडे त्याच्या “लक्ष्मी बॉम्ब’चा लुक नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात अक्षय प्रथमच तृतीयपंथीय व्यक्तीचा रोल करतो आहे. यापूर्वी परेश रावल आणि सदाशिव अमरापूरकर यांनी तृतीयपंथीय व्यक्तीचे रोल साकारले आहेत आणि ते रोल त्यांच्या अभिनय सामर्थ्यामुळे अजरामर झाले आहेत.