मुंबई – अभिनेत्री ‘ऐश्वर्या राय-बच्चन’ लवकरच आपल्या आगामी ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर येणार आहे. स्वतः ऐश्वर्या राय हिने आपल्या इंस्टाग्रामवर या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. “सुवर्णकाळ 30 सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे’. असं तिने म्हंटलं आहे.
दरम्यान, शेअर केलेल्या लुकमध्ये ऐश्वर्या जणू एकाद्या महाराणीसारखीच दिसते. ब्राऊन सिल्क साडी, गोल्डन ज्वेलरी यासोबत माथ्यावर मोठा टीळा ऐश्वर्याच्या सौंदर्याला चार चांद लावत आहेत. तिचा हा लूक पाहून चित्रपटात तिची भूमिका खूपच दमदार असल्याचे वाटत आहे. मिळालेल्या माहिती नुसार ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपटात ऐश्वर्या राय दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.
View this post on Instagram
याशिवाय हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यावर्षी तर दुसरा भाग पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळसोबत हा चित्रपट मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि हिंदीमध्येसुद्धा प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 500 कोटींचा बिग बजेट चित्रपट असणार आहे.