मुंबई – मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. मराठी चित्रपटसृष्टीतील एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिची ओळखल आहे. विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
आगामी काळात तिचा ‘पाँडीचेरी’ हा चित्रपट चाहत्यांसमोर येणार आहे. यातही सई हट के भूमिकेत आहे. हा संपूर्ण चित्रपटच एक वेगळा प्रयोग ठरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केलं आहे.
सईचा ‘पाँडीचेरी’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा ‘पाँडीचेरी’ हा भारतातील पहिला मराठी चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. त्या निमित्ताने सईने मित्रम्हणे या मराठी पॉडकास्ट शोवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी बोलताना तिने आपल्याला पुरुषाची भूमिका करायला आवडेल असं सांगितलं. तसेच ऐतिहासिक चित्रपटात देखील एखादी चांगली भूमिका करायची इच्छा यावेळी सईने व्यक्त केली.
‘पाँडीचेरी’ या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.