एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत सर्व बुकिंग थांबवले

मुंबई : एयर इंडिया विमान कंपनीने सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाचे बुकिंग ३० एप्रिल पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल नंतर पुढील आदेशानंतर निर्णय घेण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय १४ एप्रिल रोजी संपणार आहे.

या आगोदर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिहं यांनी १४ एप्रिलनंतर विमान विमान कंपन्यांचे बुकिंग सुरु करण्यात येईल अशी माहिती दिली होती. देशात लॉकडाऊन असल्यामुळे सगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  दरम्यान, देशात कोरोना रुग्णाची संख्या एका दिवसात ४७८ ने वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात २ हजार ५४७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, ६२ जणांना या घटक विषाणूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. जगभरात या विषाणूमुळे ५५ हजार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे इटलीत सर्वाधिक १३ हजारापेक्षा जास्तमृत्यू झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.