नवी दिल्ली – करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी माजी कसोटीपटू व खासदार गौतम गंभीर याने प्रथम एक खेळाडू म्हणुन काही लाख रुपयांची मदत दिली होती. त्यानंतर त्याने आपल्या खासदार निधीतून पुन्हा 1 कोटी रुपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीला केली. त्यानंतर आता तिसऱ्यांदा गौतम गंभीरने गुरुवारी आपल्या दातृत्वाचा आणखी एक दाखला देत आपला खासदार म्हणून मिळणारा दोन वर्षांचा पगारही मदतनिधी म्हणून दिला आहे.
दर महिन्याला एका खासदाराला 2 लाखांपेक्षाही जास्त रक्कम मिळते. दोन वर्षांचा पगार म्हणजे जवळपास 50 लाख रुपये गंभीरने दिले आहेत. करोना विषाणूंच्या प्रभावाने संपूर्ण पृथ्वी व्यापली जाण्याचा धोका समोर असताना याची लागण झालेल्यांच्या उपचारांसाठी तसेच सरकारी यंत्रणांच्या प्रयत्नांना मदत म्हणुन जगभरातील क्रीडापटू आपला वाटा उचलत आहेत.