गृहमंत्री अमित शहांच्या प्रकृतीबाबत ‘गुड न्यूज’

कोरोनानंतरच्या उपचारांसाठी शाह यांना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते

नवी दिल्ली – देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या आरोग्याबाबत एक गुड न्यूज मिळाली आहे. शाह यांना कोरोना उपचारानंतर काही आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत आज एम्स रुग्णालयातर्फे माहिती देताना त्यांना रुग्णालयातून लवकरच सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एम्सतर्फे याबाबत जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये, “कोरोना नंतरच्या उपचारांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. ते आता बरे झाले असून त्यांना लवकरच सोडण्यात येईल.” अशी माहिती देण्यात आली आहे.

भाजपचे जेष्ठ नेते असलेल्या अमित शाह यांची कोरोना चाचणी २ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना गुरगाव येथील मेदांता या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी  १४ ऑगस्ट रोजी ट्विट करत आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस होम आयसोलेट होणार असल्याची माहिती दिली होती.

मात्र, ५५ वर्षीय शाह यांना सातत्याने अंगदुखी, भोवळ यासारखे त्रास जाणवू लागल्याने त्यांना १८ ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनानंतरचे उपचार करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती उत्तम आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.