मुंबई – सलमान खान ‘चुलबुल पांडे’च्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या बहुचर्चित ‘दबंग ३’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे आत्तापर्यंत बरेचसे अपडेट्स सलमानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सई मांजरेकरचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.
या चित्रपटामधून मराठी अभिनेता महेश मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला सई मांजरेकर हिने याबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे या चित्रपटातील तिच्या फर्स्ट लुककडे सर्वांचे लक्ष होते.
‘दबंग ३’चे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, अरबाज खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत. २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.