मुंबई – ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री राधा सागरने अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. नुकतेच राधाने एक व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. राधाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
काही महिन्यांपूर्वी राधाने शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने आता ही गोड बातमी शेअर केली आहे. राधाने तिचा पती सागर कुलकर्णी याच्याबरोबर बेबी बंप दाखवत शूट केले आहे. याचा सुंदर व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
आज राधाचा वाढदिवस असल्याने यानिमित्त तिने ही गोड बातमी तिने सगळ्यांबरोबर शेअर केली आहे. हा व्हिडिओ शेअर करत ‘सगळ्यात चांगली बातमी देण्यासाठी सगळ्यात चांगला दिवस,’ असे तिने लिहिले आहे. दरम्यान, राधाला ‘आई कुठे काय करते’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकांमधून चांगलीच प्रसिध्दी मिळाली.