मुंबई – स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत सध्या अंकिता आणि अभिषेकच्या लग्नाबाबत गुंतागुंतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात अंकिताने अभिषेकला फसवल्यामुळे घरातील सगळ्यांचा राग अनावर झाला आहे.
शेखर आणि यश या दोघांनी अंकिताचा खोटेपणा सिद्ध करण्याचा विडा उचलला आहे. त्यातच अंकिता आणि तिची आई साखरपुड्याच्या दिवशी दवाखान्यात चालत येण्याचं सीसीटीव्हि फुटेज शेखरच्या हाती लागतात. त्यांनंतर आजी, यश आणि घरातील सगळे मिळून कट रचतात. आजी आत्महत्येचं नाटक करते. त्यावेळी मी याच गोळ्या घेतल्या होत्या, असं अंकिताच्या तोंडून निघतं. त्यावेळी सगळे भानावर येतात.
दरम्यान, अंकिताचे आई-बाबा तिथे उपस्थित असतात. बाबा या सगळ्या प्रकाराबाबात देशमुख कुटूंबीयांची माफी मागतात. त्यावेळी अनिरुद्धला हे सगळं माहित होतं हे कुटूंबीयांना कळतं. यानंतर अंकिता आणि अभिषेकमध्ये जोराचं भांडण होतं. अभिषेक अंकिताच्या कानशिलात लगावतो.
अभिषेक यानंतर काय करणार? अंकिता अभिषेकवर सुड उगवणार का? या सगळ्यांचा परिणाम अनिरुद्धच्या नोकरीवर होणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.