कोपरगाव – शालेय क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत रिंग टेनिस या खेळामध्ये श्री गणेश शिक्षण संस्थेच्या उत्कर्षा उकिर्डे या विद्यार्थिनीने उल्लेखनीय यश मिळविले. तिची १९ वर्षे वयोगटात रिंग टेनिसमध्ये राज्यस्तरीय निवडचाचणीसाठी निवड झालेली आहे.
पुणे विभागाकडून एकूण तीन खेळाडूंची राज्यासाठी निवड करण्यात आली असून, निवडचाचणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे खेळाडू राज्याचे नेतृत्व करणार आहेत. श्री गणेश शैक्षणिक संकुलात अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेची तयारी करून घेतली जाते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी दिली.
उत्कर्षाचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्त भारत शेटे, कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदीप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्नील लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल, महावीर शिंगवी, देविदास दळवी, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख, उपप्राचार्य प्रवीण दहे, प्रा. सागर हिंगे, प्रा. योगेश फटांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. बापू पुणेकर आदींनी अभिनंदन केले. तिला क्रीडाशिक्षक दिलीप दुशिंग व रवींद्र मोगल यांचे मार्गदर्शन लाभले.