नेवासा – नेवासा शहर शिवसेना प्रमुख नितीन जगताप यांची फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या सामाजिक , तसेच शिवसेनेच्या कामाची दखल घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने त्यांना शहरप्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.
शहरात २० वर्षांपासून शिवसेनेत एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे नितीन जगताप यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध आंदोलनातून सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून दिला.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शिवसेनेत शहरप्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळाली. मागील लोकसभा व विधानसभा, नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची प्रचार जबाबदारी त्यांनी सांभाळली. सलग ५ वर्षे नेवासा शिवसेना शहरप्रमुख म्हणून नगर पंचायतीच्या माध्यमातून नागरिकांची विविध विकास कामे मार्गी लावली. त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.