नगर -राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा पाठिंबा असून बिनशर्त समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन द्यावे, यांसह विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषदेसमोर कर्मचारी संघटनेच्या वतीने व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी विलास भुजबळ, नितीन घोडके, संदीप कचरे, उमेश त्रिभुवन, श्रीकृष्ण हंडाळ, मीनाक्षी सानप, धनिष्ठा पागिरे, मीनाक्षी मुळे, सचिन निकरड, गणेश बोराटे आदी सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी यांनासुद्धा शासन सेवेत कायम करण्यात यावे व आर आर मध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्र पी एस सी/एस सी मध्ये एम. पी. डब्ल्यू मध्ये स्त्री पुरुष याप्रमाणेच समुदाय आरोग्य अधिकारी सवर्ग निर्माण करावे. तसेच केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सहा वर्षानंतर सीएचओ हे शासन सेवेत कायम करून करिअर प्रोग्रेशन प्लॅन अमलात आणावे. परंतु करोनाच्या काळातील कामगिरी बघून वयाची अट शिथिल करावी.