सोनई – दिवाळीच्या सुट्टीमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा शनिदर्शन घेण्यासाठी ओघ अचानक वाढल्याने वाहनाने सर्वत्र चक्काजाम झाल्याने असून गर्दीचा महापूर दिसून येत आहे.
दिवाळी संपताच भाविक देवदर्शनासाठी फिरत असल्यामुळे शनिदर्शन घेण्यासाठी शनिशिंगानापुरात कुटुंबासह भाविक दाखल झाले आहे. तेथील वाहनतळे फूल होऊन रस्त्यावर वाहनच्या रांगा लागल्या होत्या. आ. शंकरराव गडाख यांच्या देखरेखीखाली नव्याने दर्शनपथ पूर्ण होत असल्यामुळे तेथे भाविक जाऊन सेल्फी फोटो काढण्याचा आनंद घेताना दिसत आहे.
रहदारीत ऊसवाहतूक करणारी वाहने, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने, शनिशिंगानापुरात अपुरी वाहनतळाची जागा, नियोजनचा अभाव, भाऊबीज, स्थानिक भाविक यामुळे सर्वत्र वाहतुकीचा फज्जा उडाला. भाविकाची गर्दी अचानक उसळ्याने विश्वस्तांची नियोजन करतांना दमछाक होत आहे. शनिशिंगानापुरात शनिमंदिर प्रवेशद्वार, रस्त्यावर खाजगी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने भाविक व वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याकडे पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.