राहाता – रावसाहेब रोहोकले गुरुजी सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने वंचितांची दिवाळी या उपक्रमांतर्गत राहाता तालुक्यातील ११ लाभार्थींना आर्थिक स्वरूपात मदत देण्यात आली. वाकडी शाळेचा एक, चौधरी वस्ती शाळेचे चार, तिसगाव शाळेचे दोन, लोणी मुले शाळेचा एक , पुणतांबा शाळेचा एक अशा एकूण ११ लाभार्थ्यांना पोहोच मदत करण्यात आली.
प्रातिनिधीक स्वरूपात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरी वस्ती नांदुकी बुद्रुक या शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. एकूण चार लाभार्थींना प्रत्यक्ष मदत देण्यात आली. ३५ निराधार मुलांचे पालकत्व स्वीकारलेल्या संजया उदमले उपस्थित होते.
शिक्षक परिषदेचे जिल्हा सरचिटणीस दत्ता गमे, उपाध्यक्ष संजय वाघमारे, मुख्याध्यापक रामकिसन असावा, तालुकाध्यक्ष दत्ता गायकवाड, रोहोकले गुरुजी, गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष सुधाकर आंत्रे, उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत महांडूळे ,शिक्षक परिषदेचे तालुका सरचिटणीस राजू बनसोडे, मुख्याध्यापक राजेश सरोदे, रामदास कावरे , शिक्षिका अर्चना गायकवाड व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.