संगमनेर – ग्रीनपार्क हॉटेलजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला शहरालगत असणाऱ्या गाडीने साईड दिली नाही. उलट खिशातून 3 हजार काढून घेत शिवीगाळ करण्यात आली. याबाबत संगमनेर शहर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .
गेल्या रविवारी रात्री पावणे बाराच्या दरम्यान निशिकांत वळवी (रा. पुणे) हे नाशिकहून पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांची गाडी (एमएच 19 इए 6099) ग्रीनपार्क हॉटेल परिसरात आली. संगमनेर शहरालगत असणाऱ्या एका गावातील प्रतिष्ठित व्यक्तीची गाडी ( एमएच 17 सीक्स 5370) उभी असल्याने वळवी यांना साईड मिळाली नाही म्हणून त्यांनी काय झाले अशी विचारणा केली असता “त्या” प्रतिष्ठित व्यक्तीने गाडीखाली उतरून शिवीगाळ करत गालात चापट मारली. खिशातून अंदाजे 3 हजार रुपये काढून घेतले. याबाबत वळवी यांनी लगेच शहर पोलीस ठाण्यात जाऊन त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.