शेवगाव – सारथी संशोधन अधिछात्रवृत्ती २०२३ पात्र सर्व मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशीप मिळावी, अशा मागणीचे निवेदन आज शनिवारी खासदार डॉ.सुजय विखे पाटील व आमदार मोनिका राजळे यांना देण्यात आले. खा . विखे यांचे हस्ते शेवगाव तालुक्यातील घोटण येथे रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले. पीएच.डी. संशोधक विद्यार्थी चंद्रशेखर मुरदारे, गोविंद निकम, सचिन पवार आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या वतीने आमदार राजळे यांना हा मुद्दा नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करावा, अशी विनंती करण्यात आली.