नगर – बेलवंडी व घारगाव येथील आदिवासी पारधी व दलित समाजातील सुशिक्षित बेरोजगार मुलांना मुलींना सेंट्रल बँक व स्टेट बँक यांच्याकडून तात्काळ कर्ज देण्यात यावे, व राजुर प्रकल्प कार्यालयामध्ये दिलेले सहा बचत गटाच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी आदेश मागणीसाठी सावित्रीबाई फुले संविधान गटाच्या वतीने व आदिवासी पारधी समाज संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
या वेळी अमोल भोसले, राहुल भोसले, अमोल चव्हाण, राहुल चव्हाण, छाया भोसले, अभिषेक भोसले, मुन्ना चव्हाण, दीक्षा भोसले, रामसिंग भोसले, नीलम चव्हाण, सपना भोसले, मनीषा भोसले, सुनंदा भोसले आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, सेंट्रल बँक बेलवंडी व घारगाव श्रीगोंदा येथील शाखा आदिवासी पारधी समाजाला कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी दर्शवून देखील कर्ज मिळत नाही. राजूर प्रकल्प कार्यालयामध्ये दिलेले सहा बचत गटाच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.