निघोज – निघोज आणि परिसरात आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून १९ कोटी ६५ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार नीलेश लंके यांच्याहस्ते तसेच मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.३० रोजी दुपारी चार वाजता सरपंच, उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी व संचालक तसेच गाव व परिसरातील मान्यवर तसेच ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी दिली आहे.
निघोज ते कॅनॉल ते पिंपरी जलसेन रस्ता सुधारणे ४ कोटी रुपये, जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील पर्यटक विसावा केंद्र अडीच कोटी रुपये, मुका मळा येथे बंधारा एक कोटी ६३ लाख रुपये, जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात पर्यटक भोजन कक्ष एक कोटी तीस लाख रुपये, काळे वस्ती बंधारा ७५ लाख रुपये, कवाद वस्ती बंधारा ६८ लाख रुपये, निघोज ते कुंड मंदिर रस्ता कॉंक्रटीकरण ६५ लाख, निघोज ते बोदगेवाडी रस्ता ६० लाख रुपये, मळगंगा मंदीर सुशोभीकरण ५५ लाख रुपये, लाळगे मळा बंधारा ५४ लाख, निघोज हायवे ते शिरसुले रस्ता ५० लाख, लाळगे मळा बंधारा नंबर ३, ४५ लाख रुपये, खोडा येथील बंधारा नंबर पाच ४२ लाख रुपये, तनपुरेवाडी बंधारा नंबर चार ४२ लाख रुपये, निघोज मोरवाडी, रसाळवाडी,शिववाडी, काळे वस्ती, पुनर्वसन वस्ती सिंगलफेज करणे ४० लाख रुपये, वडगाव गुंड ते देवीभोयरे शिवरस्ता ३० लाख रुपये, रामदास वरखडे दुकान ते कोंडीभाऊ लाळगे रस्ता २४ लाख रुपये, कै. लक्ष्मण लामखडे वस्ती ते संतोष नवले वस्ती २४ लाख रुपये, कवाद वस्ती,
जाधव मळा ते लक्ष्मण लंके वस्ती २४ लाख रुपये, गाडीलगाव रोड ते म्हसोबा डोह, सचिन लंके मळा ते राजू ढवळे वस्ती २४ लाख रुपये, कॅनॉल ते दिपक लाळगे वस्ती २४ लाख रुपये, लहू पानमंद वस्ती, ज्ञानेश्वर लाळगे मळा ते गणेश लाळगे मळा रस्ता २४ लाख रुपये, शांताराम कवाद वस्ती ते रामदास वरखडे दुकान २४ लाख रुपये, शिवाजी ढवळे वस्ती ते नवनाथ ढवळे मळा ते खान्याबा मळा रस्ता २४ लाख रुपये, मोरवाडी येथील संत सावता मंदिरासमोर सभामंडप २० लाख रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह २० लाख रुपये,
जिल्हा परिषद शाळा पांढरकर वाडी खोली बांधकाम दुरुस्ती १२ लाख रुपये, पांढरकरवाडी स्मशानभूमी १० लाख रुपये, शिरुर रोड हवालदार वस्ती ते गवराम ढवळे रस्ता १० लाख रुपये, सावता महाराज मंदिर सभामंडप १० लाख रुपये, रसाळवाडी, तनपुरेवाडी शाळा दुरुस्ती चार लाख रुपये अशाप्रकारे १९ कोटी ६५ लाख रुपये निधी आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला. मंगळवारी दि.३० रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच लोकनेते नीलेश लंके प्रतिष्ठान यांनी केले आहे.