मुंबई – काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकर अभिनेता फरहान अख्तरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. फरहान आणि शिबानी मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 19 फेब्रुवारीला या दोघांनी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न केलं.
त्यांच्या या लग्नाला बॉलिवूडमध्ये सेलिब्रेटी आणि त्यांच्या नातेवाईकांची उपस्थिती होती. लग्नानंतर शिबानीनं सोशल मीडियावरच नाव बदलून ‘शिबानी दांडेकर अख्तर’ असं केलं असून, त्यावर आता नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, अश्यातच आता तिनं चर्चा करण्यासाठी आणखी एक नवं कारण दिल आहे.
View this post on Instagram
शिबानीनं आपल्या हातावर एक नवीन टॅटू काढला आहे. या नवीन टॅटूचा फोटो तीन आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. शिबानीनं आपल्या हातावर फरहान आणि तिच्या लग्नाची तारीख टॅटूच्या स्वरूपात नोंदवून घेतली आहे. लग्नाची ही तारीख त्या दोघांसाठीही खास असल्याचं ती म्हणते.
View this post on Instagram
इंस्टाग्रामवर या दोघांच्या लग्नाचे काही व्हायरल झाले असून, यात तिच्या हातावर रोमन लिपीत लग्नाची तारीख असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यापूर्वी देखील शिबानीनं तिच्या 41व्या वाढदिवशी फरहानच्या नावाचा टॅटू काढला. तिने तिच्या गळ्यावर हा टॅटू बनवला आहे.