कोलकाता – कोलकात्यातील एनआरएस हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर १०जून रोजी झालेल्या हल्ल्यानंतर येथील कनिष्ठ डॉक्टरांनी संप पुकारला आहे. आज राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसएसकेएम हॉस्पिटलला भेट देत संपावर असलेल्या डॉक्टरांना आज दुपारी २ वाजेपर्यंत वैद्यकीय सेवा सुरळीत करा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा अल्टिमेटम दिला होता. मात्र ममता बॅनर्जी यांच्या अल्टिमेटमनंतर देखील येथील डॉक्टरांनी आपण आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
संपावर असलेल्या डॉक्टरांनी आज या प्रकरणी राज्याचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेत प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या सक्षम उपाय योजना आणि १० जून रोजी एनआरएस हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना कडक शासन या दोन मागण्या मांडल्या आहेत. या मागण्या मान्य होताच आपण कामावर पुन्हा रुजू होऊ असं देखील डॉक्टरांनी राज्यपालांना सांगितलं आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरातील सरकारी सवाखान्यांमधील वैद्यकीय सवांचा खोळंबा झाला आहे.
Kolkata: Members of Joint Platform of Doctors,WB met Governor today, say,"we demand adequate security in every medical college & hospital,& proper action against those who attacked doctors in NRS Hospital on June 10. We will resume working as soon as our demands are fulfilled." pic.twitter.com/qJS4xDj2pe
— ANI (@ANI) June 13, 2019