मुंबई – बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह याच्या आगामी “83′ चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट भारताने जिंकलेल्या 1983मधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आधारित आहे.
१९८३ मध्ये भारताने लॉर्ड्सच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या चित्रपटामध्ये तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका रणवीरने साकारली आहे.
पहिल्या दिवसापासून सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कौतुक सोहळ्यामध्येच रणवीरची एक पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. रणवीरने त्याच्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.”आपण जिंकलो, आई.. हा खरा विजयाचा चषक आहे”, असं कॅप्शन रणवीरने या फोटोला दिलं आहे. शेअर केलेल्या फोटोत रणवीरच्या आईने त्याच्या हातात ट्रॉफी धरली असून त्या छान हसत आहेत.