मुंबई – महाराष्ट्राचा मोठा विजय..! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाही आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्याला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही! असं म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरन त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर दिली आहे.
आदित्य ठाकरे ट्विट
Big win for Maharashtra!
The resignation of anti Maharashtra Governor has finally been accepted!He, who constantly insulted Chhatrapati Shivaji Maharaj, Mahatma Jyotiba Phule & Savitri bai Phule, our Constitution, Assembly & democratic ideals, cannot be accepted as a Governor!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 12, 2023