मिर्जापूरच्या यशानंतर अनंगशा बिस्वास ही चर्चेचा विषय झाली आहे, तिच्या अभिनयाची शैली प्रेक्षकांना बऱ्यापैकी आवडली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्ममधील अनंगशा बिस्वास हे एक सुप्रसिद्ध नाव बनले आहे, लवकरच अनंगशा मिर्जापूरच्या सिक्वेन्समध्ये सुध्दा दिसणार आहे आणि आम्ही म्हणू शकतो की ती आपल्या कला कौशल्यामुळे नक्कीच प्रत्येकाच्या हृदयात जागृत होईल.
महिला दिवसाच्या निमित्ताने, अनंगशने प्रतिबिंब : अ रेफ्लेक्सशनचे ट्रेलर बरोबर चाहत्यांना आश्चर्यचकित केले. अनंगशा आपल्या कामाने नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, पूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये दिसणारी ती एकमेव व्यक्ती आहे. या शॉर्ट फिल्म मधील लुक तिच्या आता पर्यंतच्या चित्रपटांपेक्षा वेगळे आहे. आणि ह्या शॉर्ट फिल्म मध्ये तिचे कोणतेही डायलॉग्स नाही आहे सर्व अभिनय तिच्या चेहऱ्याच्या हावभावाने केले आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की “मिर्जापूर” मध्ये अनंगशाचा अभिनय सर्वोत्कृष्ट होता तर प्रतिबिंब : अ रेफ्लेक्सशन तुम्हाला विचार करायला भाग पडेल. या विषयी बोलताना अनंगशाने सांगितले, “आम्ही ह्या शॉर्टफिल्म मध्ये एक छोट्या मुलीचा प्रवास आणि स्त्रियांबद्दलचा समाजत्व दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांना सामोरे जाणारे बऱ्याच काही गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे, जसे, ‘शरीराच्या संरचनेची लाज वाटणे’, स्वतः बद्दल नकारात्मक शंका, आत्मसम्मानची कमी, लैंगिक छळ व जबरदस्तीच्या सामना करणे.”ह्या सर्वांगोष्टीं बद्दल माहिती पडल्या वर अनंगशा च्या वैयत्तिक जीवनावर परिणाम झाला, ती म्हणाली, “ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती, चित्रपटात कोणतेही संवाद नाहीत, संपूर्ण लघुपट भावनांवर आधारित आहे.
या चित्रपटाद्वारे बाल अत्याचारावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढे जाऊन त्या मुलांवर त्याचे काय परिणाम होता ते दाखवले आहे.एक सिक्वेन्स शूट केल्यावर मी खूप वेळ व्हॅनिटी मध्ये जाऊन खूप रडले. ह्या चित्रपटाने माझ्या जीवनावर खूप नकारात्मक परिणाम पडला आहे. अनंगशाचे सुप्रसिद्ध वेब सिरीज “मिर्जापूरचे” रिलीज देट लवकरच बाहेर येणार आहे ज्यासाठी अनंगशा सुद्धा उत्साहित आहे, प्रतिबिं : अ रेफ्लेक्सशन आणि मिर्झापूरच्या व्यतिरिक्त अंगच्या ने बॉलीवूड चित्रपट “लव्ह शव ते चिकन खुराणा” आणि “खोया खोया चांद”‘ मध्ये काम केले आहे.