मुंबई : ‘परदेस’ चित्रपटातील अभिनेत्री महिमा चौधरीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमाच्या आईचे 2-3 दिवसांपूर्वी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून महिमा चौधरीची आई आजारी होत्या. महिमाने देखील नुकतेच कॅन्सरसारख्या घातक आजारातून स्वतःला सावरले आहे. गेल्या वर्षी महिमाने ‘सिग्नेचर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करत कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. मात्र यावर मात करत तिने पुन्हा कामाला सुरुवात केली.
महिमाने कॅन्सर वर मुंबईतील धीरूभाई कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल येथे उपचार करुन घेतले. याबरोबरच महिमाने व्हिडिओ शेअर करत तुषार आणि टीना अंबानी यांचे यांना आभार मानले होते. तसेच शेवटी प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचे देखील महिमाने आभार मानले होते. ‘ थँक यु अनुपम खेर तुम्ही मला आत्मविश्वास दिला, माझ्यामध्ये धाडस निर्माण केले. अगदी नरकातून ओढून आणत हात देत तुम्ही मला पुन्हा सेट वर आणलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. मी पूर्णपणे निरोगी आणि आनंदी आहे असे तिने आपल्या व्हिडिओत म्हंटले होते. महिमा अनेकदा इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई-वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
View this post on Instagram
महिमाचा अभिनेता शाहरुख खानसोबतचा ‘परदेस’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. महिमाने 2006 मध्ये बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नानंतर ती एका मुलीची आई झाली. तथापि, 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्याही आईचं निझन झालं होतं.अनेक कलाकार त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते. अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचेही दोन-तीन आठवड्यांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आता महिमा चौधरीचे देखील मातृछत्र हरपले आहे.