इंफाळ – मोठ्या संख्येने डुक्कर मरण पावल्याने मेघालयातील 19 गावांना अफ्रिकन स्वाइन फिवरचे केंद्रस्थान म्हणून घोषित करण्यात आले आहे.
त्या गावावांतील लोकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले असून या गावांच्या सभोवतालच्या 10 किमी क्षेत्रात हे निर्बंध आहेत.
या भागातून बाहेर जाण्यास आणि या भागात येण्यास निर्बंध असल्याचे शासकीय आदेशात म्हटले आहे. वराहपालनासाठी आवश्यक गोष्टींच्या वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच वराहपालनाच्या शेडमधील साहित्य बाहेर नेऊ नये असेही आदेशात म्हटले आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून अरूणाचल प्रदेश आणि आसाममध्ये 17 हजार डुकरांचा मृत्यू झाला आहे. हा विषाणू चीनमधून 2019 मध्ये भारतात आला.