महापालिकेत प्रशासकीय फेरबदल

सात उपायुक्तांच्या विभागांच्या कामकाजात बदल
पुणे –
महापालिका प्रशासनच्या कामाकाजात गतिमानता आणण्यासाठी सात उपायुक्तांच्या विभागीय कामकाजात बदल करण्यात आला आहे. राज्यशासनाकडून गेल्या महिनाभरात प्रतिनियुक्तीने आलेल्या तिघांकडे कामकाज सोपविण्यात आले आहे.

उपायुक्त अनिल मुळे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता व्यवस्थापन विभाग तसेच दक्षता विभागाचा पदभार होता. त्यांच्याकडे आता केवळ सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज ठेवण्यात आले असून दक्षता विभाग व मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे कामकाज राजेंद्र मुठे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर, भूसंपादन विभाग व निवडणूक विभागाची जबाबदारी असलेल्या संतोष भोर यांच्याकडील भूसंपादन विभागाचे कामकाज काढून घेण्यात आले असून ही जबाबदारी डॉ. वनश्री लाभशेटवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

तसेच डॉ. लाभशेटवार यांच्याकडील क्रीडा विभागाची जबाबदारी आता संतोष भोर यांच्याकडे असेल. उपायुक्त सुनील इंदलकर यांच्याकडे समाज विकास व समाज कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा विभाग या पूर्वी उपायुक्त नितीन उदास यांच्याकडे होता. तर उदास यांच्याकडील एलबीटी आणि परिमंडळ-2 चा पदभार कायम ठेवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.