मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतंच 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे.
‘आदिपुरुष’चं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘आदिपुरुष’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कुठे प्रेक्षक चित्रपटावर टीका करत आहेत तर कुठे चित्रपटविरोधात थेट दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय.
आता आदिपुरुष विरोधात FIR दाखल करण्यात आलाय. अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे निर्माते आणि स्टारकास्ट यांच्या विरोधात हजरतगंज पोलिसात FIR दाखल केला आहे. या संदर्भातील व्हिडिओ देखील त्यांनी मीडियावर पोस्ट केला आहे.
एक तरफ सरकार #श्री_राम_मंदिर की तैयारियां कर रही दूसरी तरफ प्रभू की छवि को खराब करती फिल्म यू. पी. मे धड़ल्ले से चल रही है #हिन्दू_महासभा #आदिपुरुष_को_बैन करने की मांग करती है अन्यथा जल्द ही पूरे प्रदेश मे इस फिल्म को लेकर बड़ा जन-अन्दोलन होगा।@myogiadityanath @ChiefSecyUP pic.twitter.com/aBxnFZSXNe
— Shishir Chaturvedi (@HinduShishir) June 18, 2023
शिशिर चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, “हा चित्रपट आक्षेपार्ह संवाद, वेशभूषेसह हिंदू देवतांच्या प्रतिमा विकृत करून हिंदूंच्या भावनांचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय. इतर धर्माच्या धर्मप्रमुखांशी संबंधित चित्रपट बनवण्याचे धाडस चित्रपट निर्मात्यांना नाही.’ असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या सगळ्या वादानंतर आता चित्रपटाच्या कमाईवर देखील मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.