- 6 जणांचा मृत्यू
- 1243 जणांना डिस्चार्ज
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शहरात आज 1731 नवीन रुग्णांची भर पडली. तर 6 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 1 लाख 32 हजार 266 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 1694 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 37 रुग्णांची नोंद झाली. तसेच दिवसभरात 6 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 4 तर शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील पिंपळे सौदागर, चिखली, बोपखेल, दिघी येथील 4 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील वाघोली व येरवडा येथील दोघांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2783 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1961 व शहराबाहेरील 822 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 1243 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 14 हजार 891 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 6750 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1949 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 2543 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 12,871 वर पोहचली आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 15,414 इतकी आहे. तसेच आज दिवसभरात 5909 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत 1 लाख 22 हजार 50 जणांना लस देण्यात आली आहे.