मुंबई – ‘कला’ सिनेमातील अभिनेत्री तृप्ती डिमरी ही अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ आणि चित्रपट निर्माता कर्णेश शर्माला डेट करत होती. मात्र या दोघांनी आपल्या नात्याबद्दल स्पष्टपणे बोलणे टाळले. मात्र या दोघांचे सोशल मीडियावर नेहमी एकत्र फोटो दिसत होते. मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये तृप्तीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कर्णेशसोबतचा किस करतानाचा एक फोटो शेअर केला होता. यावरून त्यांनी आपले नाते जाहीर केल्याचे म्हंटले गेले होते. मात्र आता या दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तृप्तीने कर्णेशसोबतचे तिचे इतर फोटोही डिलीट केले आहेत. त्याचवेळी कर्णेशने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून तृप्तीचे बुलबुलचे पोस्टर हटवले आहे. यावरूनच त्यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप याबाबत दोघांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, अनुष्का आणि कर्णेश यांनी मिळून क्लीन स्लेट फिल्म्स नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. तृप्तीने या प्रॉडक्शन हाऊसच्या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. तृप्तीने 2017 मध्ये ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिने ‘लैला मजनू’ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. आता लवकरच ती संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांच्यासोबत झळकणार आहे.