मुंबई – साऊथची स्टार रश्मिका मंदान्ना ‘नॅशनल क्रश’ आहे. ‘पुष्पा : द राइज’नंतर रश्मिका घराघरात प्रसिद्ध झाली. चित्रपट हिट झाल्यानंतर रश्मिकाची फॅन फॉलोइंग ज्या वेगाने वाढली आहे, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे.
View this post on Instagram
अलीकडेच, रश्मिका मंदान्ना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी अभिनेत्रीने जीन्ससह एक साधा विणलेला टॉप परिधान केला होता, प्रत्येक वेळी अभिनेत्रीने तिच्या हसण्याने आणि लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या रश्मिका मंदान्ना तिच्या मराठा मोळ्या लूकमुळे चर्चेत आहे.
यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२३ सोहोळ्यामध्ये ‘रश्मिका मंदान्ना’ अप्रतिम लावणीवर ठेका धरताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेक मध्ये केली आहे, सोबतच ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसेल. ‘रश्मिका मंदान्ना’ कन्नड, हिंदी, तेलगू आणि तामिळ या ४ भाषांमध्ये काम करत असलेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.
यंदाच्या सोहळ्यात खूप काही खास असणार आहे, विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकरही या मंचावर आपला डान्स सादर करणार आहेत. याशिवाय विनोदाची आतिषबाजी हा तर या सोहळ्याचा मुख्य भाग असतोच. पण यंदा झी चित्रगौरव च्या मंचावर येणार श्रीवल्ली रश्मिका मंदाना येणार असल्याने प्रचंड चर्चा झाली आहे.