मुंबई – अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिध्दी पायलट बनली आहे. पोंक्षे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का?आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे.करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा.”
View this post on Instagram
सिद्धी ही सुरूवातीपासून हुशार होती. बारावीमध्ये असताना तिने विज्ञान शाखेत 87 टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर आता ती वैमानिक झाली आहे. वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती परदेशात होती. ती आता लवकरच भारतात परतणार आहे.
तीच्या या यशाचे मराठी सिनेसृष्टीतील अनेकांकडून कौतूक केले जात आहे. दरम्यान, कलाकारांची मुले ही बहुधा कलाकार क्षेत्रातच असल्याचे दिसून येते. क्वचितच एखाद्या कलाकाराची मुले इतर क्षेत्रात आपलं नावलौकिक करतात. त्यात सिद्धीने वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न उतरता पायलट होण्याचा निर्णय घेतला आणि ती त्यामध्ये यशस्वी देखील झाली आहे.