वाघोली (पुणे) – होमक्वारंटाईन नागरीकांनी सुरक्षित घरात राहणे गरजेचे आहे. कोणालाही विनाकारण बाहेर फिरता येणार नाही. जर कोणीही होमक्वारंटाईन व्यक्ती पोलीस तपासणीवेळी घरी मिळून न आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारावाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिला आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत वाढत्या करोनामुळे दि. 1 जानेवारी पासून आजपर्यंत विनामास्क फिरणाऱ्या 2536 जणांवर कारवाई करून 3 लाख 40 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 32 हॉटेल व इतर आस्थापनांवर कारवाई करून 80 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 9 जणांवर गुन्हे दाखल करून मंगल कार्यालय व हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
सोसायटीमधील क्लब हाऊस बंद ठेवण्यात आले आहे. लग्न समारंभासाठी 50 लोकांना परवानगी राहील. सर्व जनतेने पायी चालत असो वा गाडीवर असताना सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे. सॅनिटायझरचा वापर करणे. सोशल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा कारवाई होऊ शकते.