पळसदेव – प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर विद्यार्थी ध्येय साध्य करू शकतात. त्यासाठी मेहनत केल्यास यश नक्कीच मिळेल. आलेल्या संधीचे सोनं करा. चांगल्या संधी आयुष्यात सतत येत नसतात. त्यामुळे आलेली योग्य संधी ओळखायला शिका. आपण जीवनात मोठे होऊ, असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले. पळसदेव (ता. इंदापूर) येथे एल. जी. बनसुडे विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
विज्ञान प्रदर्शनात विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी निबंध, प्रश्न मंजुषा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लहान गटात अनुक्रमे सोहम सुतार, रितूल शहा, समीक्षा पवार यांनी यश मिळविले. मोठ्या गटात वैभव हगवणे, एस. भुजबळ, साहिल सय्यद यांनी यश मिळविले. प्रश्न मंजुषा स्पर्धेत वैभव पारेकर, हर्षदा राऊत, शिवानी सोलनकर तर वक्तृत्व स्पर्धेत ईश्वरी राऊत, संस्कृती राणे, रुचिरा हेगडे तर लहान गटात सूरज शिंदे, शशिकांत जाधव, धनश्री ठोंबरे व निबंध स्पर्धेत साक्षी गुरव, तनिषा बांदल, आदिती खत्री व उतेजनार्थ काही विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले.
आमदार भरणे यांनी बनसुडे विद्यालयास 25 लाख रुपयांचा निधी जाहीर केला. संगीत साहित्यांसाठी 50 हजार रुपये मंजूर केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, प्रताप पाटील, दयानंद महाराज कोरेगावकर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदा बनसुडे, शीतलकुमार शहा, नितीन बनसुडे, मेघराज कुचेकर, हनुमंत मोरे, सुजित मोरे, विठ्ठल बनसुडे, प्राचार्य वंदना बनसुडे, अनुराधा शहा, सूरज बनसुडे, कृष्णा हेळकर, सूर्यकांत थोरात उपस्थित होते.