समर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई
पुणे: मारहाणीच्या गुन्हयात सात वर्षापासून फरार असलेल्या गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी जेरबंद केले. संतोष वसंत कुसाळे( 38, रा.पिंपळी गवळी, जि.अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने 10/6/2013 रोजी साथीदारांसह गुन्हा केला होता. तेव्हा पासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
फिर्यादी ज्ञानेश्वर मुरलीधर बोरकर(रा.शिरुर) यांना आरोपी संतोष कुसाळे व त्याच्या तीन साथीदारांनी मारहाण केली होती. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी गुन्हा घडल्यावर अटक केली होती. मात्र संतोष हा गुन्हयानंतर फरार झाला होता. फरार गुन्हेगारांचा शोध घेत असताना, समर्थ पोलिसांना तो पिंपळी गवळी या त्याच्या गावी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार पोलीस हवालदार संतोष थोरात, संतोष काळे, पोलीस शिपाई सुमित खुटटे यांनी पिंपरी गवळी येथे जाऊन खातरजमा केली. तो घरी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे ,पोलीस हवालदार संतोष थोरात, संतोष काळे, सुशिल लोणकर, राजस शेख, पोलीस नाईक प्रमोद टिळेकर, पोलीस शिपाई सुमित खुटटे, निलेश साबळे, साहिल शेख, अनिल शिंदे, सचिन पवार, स्वप्निल वाघोले, गणेश कोळी यांच्या पथकाने केली