पुणे: अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत सोळा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरूणाची सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. फिर्यादीने एफआयाअर दाखल करताना दिलेला जबाब, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेली माहिती आणि न्यायालयासमोर दिलेल्या साक्षीत तफावत असल्याची बाब बचाव पक्षाचे वकील ऍड. आयुब पठाण यांनी न्यायालयाच्या निर्दर्शनास आणून दिली. सरकारी पक्ष दोघे लॉजवर गेल्याचे आणि त्याने तिला सोशल मिडीयावर फोटो व्हायरलकरण्याची दिलेली धमकी सिध्द करू शकला नाही.
प्रकाश श्रीरंग शेवाळे (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) असे मुक्तता झालेल्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. आयुब पठाण यांनी काम पाहिले. त्यांना ऍड. रियाज तांबोळी, ऍड. शितलकुमार देशपांडे आणि ऍड. अहमद शेख यांनी मदत केली. शेवाळे याने पीडितेला 2014 रोजी घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. तिचे अश्लील फोटो काढले होते. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन 1, 7, 8 आणि 17 फेब्रुवारी 2015 रोजी कार्ला, तळेगाव दाभाडे येथे तिच्यावर बलात्कार केला.
13 फेब्रुवारी रोजी तिच्या वडिलांच्या एटीममधून काढून 10 हजार रुपये घेतले, असा आरोप शेवाळे याच्यावर ठेवण्यात आला होता. गुन्ह्यातील मोबाईल जप्त करण्यात आला नाही. तसेच जप्त केलेले कपडे नेमके कोणत्या दिवशी घातले, हे सिद्ध होत नसल्याचे बचाव पक्षाचे वकील आयुब पठाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.