मुंबई – ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमध्ये माधुरी भाभीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री इशा तलवारचा शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिने अपघात झाल्याची माहिती दिली आहे. सोशल मीडियाच्या स्टोरीमध्ये तिने दोन फोटो शेअर केले आहेत. या दुर्घटनेनंतर चाहत्यांनी इशाच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. या दुर्घटनेमुळे तिच्या डोळ्याला मार लागला. शूटिंग दरम्यान सेटवर स्क्विब मशीनचा वापर करण्यात आला होता. त्या मशीनमुळे तिच्या डोळ्याला दुखापत झाली. तिने सोशल मीडियाच्या स्टोरीमध्ये फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे दिसते.
याबाबत पोस्ट करत इशाने लिहिले की, “सेटवर खूपच अंधार होता आणि स्क्विब्स थेट माझ्या डोळ्याला लागली. त्यामुळेच माझा डोळा सूजला आणि काही वेळानंतर मी तो डोळाच उघडू शकत नव्हते. दुखापत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सहकलाकार दीपक डोब्रियाल यांनी मला डॉक्टरकडे नेलं. त्यानंतरही तीन दिवस मी त्या डोळ्याची नीट उघडझाप करू शकत नव्हती. तीन दिवसांनंतर मी सेटवर परतले.”
सेटवर शूटिंग दरम्यान डोळ्याला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तिला उजेडात जाण्यास सक्त मनाई केली. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या नियमांचे पालन करत तीन दिवस अंधारातच राहावं लागलं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी केले आहे. ‘सास बहु और फ्लेमिंगो’ हा चित्रपट 5 मे रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. ‘सास बहू और फ्लेमिंगो’ चित्रपटात ॲक्शन सीन्स होते. यात इशाने अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या सुनेची भूमिका साकारली आहे.