नवी दिल्ली – पंजाबमधील फुटिरवाद्यांशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे संबंध आहेत, या आरोपावरून युथ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज केजरीवाल यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने केली. केजरीवाल यांनी पंजाबमधील फुटिरवाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप “आप’चे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी केला होता. त्यानंत कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून केजरीवाल यांच्यावर टीका केली जाते आहे.
केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप हास्यास्पद आहेत, असे केजरीवाल म्हणाले. देशाली भ्रष्ट व्यक्तींनी कुमार विश्वास यांच्याशी हातमिळवणी केली आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली.
युथ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंदिग्राम आखाड्यापासून केजरीवाल यांच्या घरापर्यंत निषेध मोर्चा काढला आणि “आप’विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, मात्र केजरीवाल यांच्या घराजवळ त्यांना पोलिसांनी अडवले.