दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

कामशेत -पाथरगावच्या हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रिक्षाची वाट पाहत उभ्या असणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचा अज्ञात दुचाकीच्या धडकेने मृत्यू झाला. दशरथ जानकू बोंबले (वय 62, रा. पिंपळोली, ता. मावळ) हे बुधवारी (दि. 15) सकाळी साडेअकराच्या सुमारास पाथरगावच्या हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनाची वाट पाहत उभे असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना जोरात धडक दिली.

या अपघातात दशरथ बोंबले यांच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाले. कामशेतमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार दरम्यान शुक्रवारी (दि. 17) सकाळी दशरथ बोंबले यांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.