कामशेत – कामशेत येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या “वेट ऍण्ड जॉय’ वॉटर पार्कमध्ये गोरेगाव, मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या दोघींचा विनयभंग करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी विकास मारुती घोलप (वय 28, रा. घोलपवाडी, भीमा टाकळी, ता. शिरूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 18) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुंढावरे येथील “वेट ऍण्ड जॉय’ वॉटर पार्कमधील व्हेव पुलाच्या पाण्यात फिर्यादी व त्यांनी नणंद पाण्यात खेळत असताना फिर्यादीची नणंद हिने फिर्यादीस येऊन सांगितले की एक बुटका व जाड इसम छेड काढत आहे.
त्यानंतर फिर्यादी त्या इसमाचा शोध घेत असताना त्यांचाही विनयभंग केला. गार्डच्या मदतीने या माणसाला पकडले. फिर्यादीच्या पतीने जाब विचारला असता त्याने माफी मागितली व नाव विचारले असता त्याने विकास मारुती घोलप असे सांगितले.