बुल्गारीच्या 140 व्या वर्धापन दिनानिमित्त एक भव्य डिनर आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये Bulgari चे उच्च दागिने कलेक्शन Aeterna प्रदर्शित करण्यात आले होते. प्रियांका चोप्रा या गाला डिनरमध्ये इतका ग्लॅमरस आणि महागडा डायमंड नेकलेस घालून पोहोचली की काही मिनिटांतच तिचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले. प्रियांका चोप्रा ऑफ शोल्डर व्हाइट आणि ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये दिसली होती. विशेष म्हणजे प्रियांकाचा हा गाऊन खालून पूर्णपणे पारदर्शक आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी प्रियांकाने तिच्या गळ्यात रुंद डायमंड नेकलेस घातला होता. वोग अरेबियाच्या वृत्तानुसार, प्रियांका चोप्राचा हा नेकलेस सर्पेन्टी एटर्नाचा आहे. 200 कॅरेट हिऱ्यांचा समावेश असलेला हा सुंदर नेकलेस बनवण्यासाठी सुमारे 2800 तास लागले. हा सुंदर 7 ड्रॉप आकाराचा हार सध्या चर्चेत आहे. प्रियांका अनेक वर्षांपासून बल्गारी ब्रँडशी जोडलेली आहे. यापूर्वी, 2023 मध्ये झालेल्या मेट गालामध्ये बल्गेरीचा निळ्या रंगाचा नेकलेस देखील चर्चेत होता. अहवालानुसार ज्याची किंमत 25 दशलक्ष म्हणजे 2.5 कोटी रुपये होती. या कार्यक्रमात अभिनेत्रीच्या डिझायनर ड्रेसपेक्षा तिच्या हिऱ्यांनी जडवलेल्या नेकलेसने लोकांचे लक्ष वेधून घेतलेहोते .यापूर्वी प्रियांका चोप्रा मेट गाला 2023 मध्ये तिने घातलेल्या खास ज्वेलरीमुळे चर्चेत आली होती. अभिनेत्रीने 204 कोटी रुपयांचा नेकलेस घातला होता. प्रियांका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, हेड्स ऑफ स्टेट ही एक ॲक्शन कॉमेडी आहे, ज्यामध्ये प्रियांका चोप्रा सोबत जॉन सीना आणि इद्रिस एल्बा आहेत.